न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. २२ डिसें.) :- आकुर्डी येथील डॉ. माया भालेराव यांच्या “रंग- स्पंदन” या जलरंग चित्रप्रदर्शनाचे उदघाटन मंगळवार (दि. १८) रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते वालचंद कोठाडिया आर्ट गॅलरी, हेगडेवार भवन, प्राधिकरण निगडी येथे करण्यात आले.
यावेळी इंडिअन मेडीकल असोसिएशन पिंपरी -चिंचवड- भोसरी शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवधर, विश्वस्त डॉ. दिलीप कामत, सचिव डॉ. संजीव दात्ये, अखिल भारतीय भूलतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. शोभा जोशी, प्रसिद्ध अभिनेते डॉ संजीवकुमार पाटील, डॉ. प्रवीण सप्तर्शी व अनेक मान्यवर उपस्थित होते.
छंद म्हणून जोपासलेल्या या जलरंग निसर्गचित्र प्रदर्शनात चित्रांमध्ये मुक्तपणे केलेली रंगांची उधळण, त्यातील तरलता आणि ताजेपणा आकर्षक वाटत होता, असा प्रतिसाद आणि अभिप्राय आलेल्या रसिकांनी दिला.
कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सुधीर भालेराव व ईश्वरी भालेराव यांनी केले होते.










