न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २२ डिसें.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत’ थेरगाव परिसरातील जय भवानी चौकापासून ते सिध्दीविनायक कॉलनी पर्यंत केबल टाकण्यासाठी रस्त्याची खोदाई केलेली होती.
शिवसेनेच्या वतीने ‘ग क्षेत्रीय’ कार्यालयाकडे खोदाई केलेल्या रस्त्याची डागडुजी करण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी निवेदन देऊन, पाठपुरावा चालू होता व आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला होता. याची दखल घेत ‘ग प्रभागाच्या’ स्थापत्य विभागाकडून खोदाई केलेल्या ठिकाणचा रस्ता पुर्वरत करण्यात आला आहे. परिसरातील रस्ते खोदाईची दुरूस्तीही करण्यात आलेली आहे.
याबाबत शिवसेना राहटणी-काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने प्रशासनाचे आभार मानले आहेत. परिसरातील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे, असे युवराज दाखले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.










