- पालिकेकडून ३ हजार २२३ चौरस फुट आरसीसी बांधकाम उध्वस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मार्च २०२१) :- तळवडे, रुपीनगर, सहयोगनगर येथे नव्याने सुरू असलेल्या ५ अनधिकृत बांधकामांवर ‘ फ ‘ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत बुधवारी ( दि. १६) कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान ३ हजार २२३ चौरस फुट इतके आरसीसी बांधकाम पाडण्यात आले. पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ही कारवाई केली.
कारवाईमध्ये गट क्रमांक १६७ टॉवर लाईनच्या बाजूला सहयोगनगर, रुपीनगर व गट क्रमांक १६३/१६४ येथील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. कारवाईसाठी २ जेसीबी, २ डंपर आदी साहित्य वापरण्यात आले.















