- तालेरा टिबी युनिटअंतर्गत चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये कार्यक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मार्च २०२१) :- जागतिक क्षयरोग दिनानिमित्त तालेरा टि बी युनिट अंतर्गत, चिंचवड स्टेशन रुग्णालय अंतर्गत चिंचवड पोलिस स्टेशन या ठिकाणी सोशल डिस्टंस नियमांचे पालन करुन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अंजली ढोणे, वैद्यकिय अधिकारी डॉ. विद्याधर फल्ले, चिंचवड स्टेशन रुग्णालय हे उपस्थित होते. सर्व उपस्थितांना शहर क्षयरोग वैद्यकिय अधिकारी डॉ अंजली ढोणे यांनी क्षयरोग लक्षणे बाबत माहिती दिली तसेच वैद्यकिय अधिकारी डॉ. विद्याधर फल्ले क्षयरोगाचे निदान, आणि उपचार या विषयी सविस्तर माहिती दिली.
किशोर गवळी (TBHV) यांनी प्रास्ताविक व आहार-व्यायाम याविषयी माहिती सांगितली. पल्लवी डोके (STLS) व लहू मुंडे (TBHV) यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अति. आरोग्य वैद्यकिय अधिकारी तथा वैद्यकिय संचालक डॉ. पवन साळवे, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.















