न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. २० मार्च) रोजी १४३१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ६२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – दापोडी (६०वर्षे), आकुर्डी (३५ वर्षे) ०५ स्त्री – चिंचवड (६५,५० वर्षे), कासारवाडी (६७ वर्षे), पिंपरी (७०,६६ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ स्त्री – लोहगाव (८९ वर्षे), मुळशी (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ०३ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १२०९४९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०८७६६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १९०४ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २१९, ब – २१८, क – १६०, ड – २५५, इ – १५८, फ – १५१, ग – १५२, ह – ११८, एकुण – १४३१.
















