न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. २२ मार्च) रोजी ११८७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०७ पुरुष – चिंचवड (८७ वर्षे), चिखली (७५वर्षे), दिघी (४५ वर्षे), विकासनगर, देहूरोड (७२ वर्षे), मोशी (७२ वर्षे), पिंपरी (५८ वर्षे), पिंपळे निलख (६७ वर्षे) ०४ स्त्री – भोसरी (८९ वर्षे), चिंचवड (७५ वर्षे), नेहरुनगर (७० वर्षे), भोसरी (६४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – जुन्नर (७४ वर्षेषे), आंबेगाव (८५ वर्षे), चाकण (६५ वर्षे) ०१ स्त्री – देहूरोड (६५ वर्षे) येथील रहिवासी आहेत. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ०२ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १२३५५२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ११०४०४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १९२३ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – १६५, ब – १८६, क – १५७, ड – १८३, इ – १४४, फ – १३६, ग – १३०, ह – ८६, एकुण – ११८७.
















