- महापौर उषा ढोरे यांची महापालिका आयुक्तांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे मार्केटमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तिथे निर्बंध कडक करावेत.
चौकांमधील गर्दी कमी होताना दिसून येत नाही. चौकांमध्ये जमावबंदी लावावी. नागरिकांना बंधने घातली पाहिजेत. त्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू करावा अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.
त्यावर जिल्हाधिका-यांशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले असल्याचे महापौर ढोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
















