न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २३ मार्च) रोजी १५१९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०८ पुरुष – आकुर्डी (६४ वर्षे), पिंपळे सौदागर (६६ वर्षे), चिंचवड (७६ वर्षे), मोशी (६९ वर्षे), वल्लभनगर (६८ वर्षे), कासारवाडी (७६ वर्षे), दापोड़ी (६५ वर्षे), चिखली (६९ वर्षे), ०२ स्त्री – पिंपरी (७५ वर्षे), भोसरी (७२ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – खेड (५४ वर्षे), वडगाव शेरी (६७ वर्षे), ०१ स्त्री – पुणे (७२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १२५०७१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १११२१६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १९३३ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – १६९, ब – २६१, क – १३७, ड – २७७, इ – १६७, फ – १७१, ग – २००, ह – १३७, एकुण – १५१९.
















