न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार कोविड – वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड -११ लसीकरण कार्यक्रम दि. १६ जानेवारी २०२१ पासून राबविण्यात येत आहे. नोंदणी कृत आरोग्य सेवा देणारे व फ्रन्ट लाईन वर्कर, ६० वर्षावरील व्यक्ती तसेच या वयोगटातील महव्याधी (अतिजोखमीचे आजार) असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या १८ व १७ या लसीकरण केंद्रावर दि.१६ जानेवारी २०२१ ते आजपर्यंत १.०२.३२१ (एक लाख दोन हजार तीनशे एकवीस) नागरीकांना लसीकरण करण्यात आलेले आहे.
वय वर्षे ४५ ते ६० या वयोगटातील सहव्याधी (अतिजोखमीचे आजार) यासाठी नागरिकांच्या निदानासाठी निर्धारीत यादी केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभागाकडून आवाहन करण्यात येते की, पिंपरी चिंचवड शहरामधील ६० वर्षावरील व्यक्ती तसेच ४५ ते ६० या वयोगटातील सहव्याधी (अतिजोखमीचे आजार) असलेल्या नागरिकांनी यादीमधील दुर्धर आजार आहेत, त्यांनी महानगरपालिकच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड -१९ प्रसार रोखण्यासाठी कोविड -१९ लसीकरणानंतरही मास्क, सैनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर राखणे या गोष्टी पाळणे आवश्यक आहे.
















