न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. २४ मार्च) रोजी १८६५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०७ पुरुष – मोशी (२२ वर्षे), पिं. सौदागर (५८ वर्षे), पिं. गुरव (७५ वर्ष) भोसरी (८६,७५ वर्षे), सांगवी (४२ वर्षे), पिंपरी (६२ वर्षे), ०३ स्त्री – पिंपरी (६७ वर्षे), चिंचवड (५८, ६० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – चाकण (६५ वर्षे), पाबळ (६५ वर्षे), आळंदी (६५ वर्षे), मावळ (७३ वर्षे), ०१ स्त्री- राजगुरुनगर (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत. टिप:- आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १० मृत्यू झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १२६९३६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ११२०४० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १९४३ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २४०, ब – ३८६, क – १४२, ड – ३११, इ – १६७, फ – २०५, ग – २७१, ह – १४३, एकुण – १८६५.