- मतदारांच्या नावांची यादी निवडणूक विभाग करू शकतो प्रसिद्ध?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२४) :- सोमवारी झालेल्या मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ५ टक्के कमी झाली. मावळ विधानसभा मतदारसंघातही मतदानाची टक्केवारी समाधानकारक नाही. ४५ टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे. या निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व मतदारांच्या नावांची यादी निवडणूक आयोगाकडे असून, निवडणुकीत मतदान न करणाऱ्या सर्व मतदारांची नावे निवडणूक आयोगाने विविध माध्यमातून जाहीर करावीत. मतदान न करण्याच्या कारणांची चर्चा होऊन त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी सजग नागरिकांतून होऊ लागली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात अवघे ५४.८७ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच अद्यापही ४५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही. लोकशाहीचा उत्सव साजरा करीत असताना लोकसभा निवडणूक प्रक्रियेवर आयोगामार्फत सरकारी यंत्रणेसह मोठी रक्कम खर्च होत आहे.
मतदार संख्येचा विचार करून तसेच मतदार यादीतील सर्व मतदार मतदान करतील, असे गृहीत धरून सर्व नियोजन आयोगाकडून करण्यात येत असते. संपूर्ण यंत्रणा कामाला लावली जाते.















