न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२१) :- पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने नगरसेविका सविताताई नरेश खुळे यांना कोरोना योद्धा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. संथापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देण्यात आले.
यावेळी सर्वसामान्य शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वाल्मिक कुटे, पोपट आपा कापसे, श्रीराम नखाते, बळिराज जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यादव, नरेश खुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाच्या संपूर्ण वर्षभराच्या काळात नगरसेविका सविता खुळे यांनी जीवाची पर्वा न करता जनसेवेला प्राधान्य देत कोरोना योद्धा म्हणून काम केले. लॉकडाऊनमध्ये गरजू लोकांना धान्य वाटप, मास्क वाटप, खबरदारी घेण्याबाबत वेळोवेळी नागरिकांमध्ये केलेली जनजागृती, औषध फवारणीसह विविध उपाययोजना राबवत परिसरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
















