- पिं. चिं. अॅड. बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२१) :- मोरवाडी येथील न्यायालयाची स्थलांतर होण्याची प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तसेच, निविदेचा कालवाधी कमी करून हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
पुणे जिल्हा न्यायाधीशांच्या पत्राची माहिती महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाला देण्यात आली. काम तातडीने सुरू होण्याची अपेक्षा असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या वतीने इमारतीच्या अंतर्गत कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी २१ दिवसाचा कालावधी असतो. त्या अनुषंगाने त्याची वेळ कमी करता येत नसल्याचे महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील यांनी असोसिएशनला सांगितले होते. त्या अनुषंगाने असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन इमारतीच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यावेळी न्यायालयाच्या कामासाठी कमीत कमी कालावधी मंजूर करू, असे आश्वासन त्यांनी दिले. असोसिएशनचे अॅड. पांडुरंग शिनगारे, महेश टेमगिरे, मोनिका गाढवे, धनंजय कोकणे उपस्थित होते.
















