- प्राधिकरणाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवगनर विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने वाल्हेकरवाडी परिसरातील दोन ठिकाणी, तसेच काही ठिकाणच्या पत्राशेडवर कारवाई केली. वाल्हेकरवाडी परिसरात तीन मजली बेकायदा बांधकाम करण्यात आले होते.
प्राधिकरणाने घरमालकाला दोन वेळा नोटिसा दिल्या. त्याचप्रमाणे वाल्हेकरवाडी परिसरातील सहा अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी, उपमुख्य कार्यकारी अभियंता अभिषेक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.
















