- अनधिकृत विट बांधकाम व पत्राशेड उध्वस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२१) :- पिंपळे निलख येथे शुक्रवारी (दि. २६) रोजी महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चालू असलेले अनधिकृत बांधकामावर व पत्राशेडवर कारवाई केली.
या कारवाईमध्ये पिंपळे निलख येथील ४६७ चौ. मी. अनधिकृत विट बांधकाम व पत्राशेड एकुण बांधकामावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई कार्यकारी अभियंता सुनील भागवानी यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता संजय तूपसाखरे, कनिष्ठ अभियंता दामू तापकीर यांचे पथकाने केली.
ही कारवाई १० मनपा पोलिस, २ जे.सी.बी. ट्रक, ट्रॅक्टर, १० मजूर, १५ मनपा कर्मचारी यांचे सहकार्याने करणेत आली.


















