न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. २७ मार्च) रोजी १६९४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १२४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष –पिंपळे सौदागर (६२ वर्षे), चिखली (६६ वर्ष), बोपखेल (६३ वर्षे), ०१ स्त्री – दिघी (६५ वर्ष) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले २ पुरुष हे वाघोली (३१ वर्षे), येरवडा (५९ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १३२२६६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ११४८९१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १९६१ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २५०, ब – २६७, क – १४५, ड – २७६, इ – १४७, फ – २३३, ग – २४५, ह – १३१, एकुण – १६९४.
















