- अन्यथा पालिकेच्या निधीला मुकावे लागणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील प्रवाशाच्या अडचणी सोडविण्यासाठी पीएमपीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक आठवड्यातून तीन दिवस पिंपरी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.
सोमवार, बुधवार, शुक्रवार या तीन दिवशी ते लोखंडे कामगार भवन येथील पीएमपीएलच्या कार्यालयात उपस्थित राहतील. ते उपस्थित राहिल्यासच पीएमपीएलला पिंपरी चिंचवड महापालिकेकडून निधी दिला जाणार आहे. त्याबाबतच्या विषयास महापालिकेच्या स्थायी समिती सभेने नुकतीच मंजुरी दिली.