- वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल २०२१) :- महाराष्ट्र बँकेचा धनादेश सही करून फिर्यादीने त्यांच्या गाडीत ठेवला होता. जानेवारी २०२१ ते १८ मार्च २०२१ या कालावधीत आरोपीने तो धनादेश चोरला. त्यावर १६ लाखांची रक्कम भरून तेवढे पैसे बँकेतून काढून चोरी केले. ही घटना थेरगाव येथे घडली.
शरद कुंडलिक बारणे (वय ३९, रा. थेरगाव) यांनी याबाबत बुधवारी (दि. ३१) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तात्रय शंकर जाधव (रा. नेरे दत्तवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.