- रावेत, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडीतील सदनिकांसाठी वेळापत्रक जारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविणेत येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये निवड झालेले जे लाभार्थी कागदपत्र छाननीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत अशा रावेत प्रकल्पासाठीच्या लाभार्थ्यांना दि. ५ एप्रिल २०२१ ते ७ एप्रिल २०२१ पर्यत कागदपत्रे तपासणीकामी उपस्थित राहण्याचे नियोजन करणेत आले आहे, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके व आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. तर रावेत प्रकल्पासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना उर्वरीत कागदपत्रे सादर करणेसाठी दि. २० एप्रिल २०२१ व दि.२२ एप्रिल २०२१ रोजी संधी देण्यात आली आहे.
बो-हाडेवाडी प्रकल्पासाठी निवड झालेल्या व जे लाभार्थी पहिल्या टप्प्यात उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी दि. ८ एप्रिल २०२१, ९ एप्रिल २०२१ व दि.१२ एप्रिल २०२१ रोजी तपासणी करण्याचे नियोजन करणेत आले आहे. तर बो-हाडेवाडी प्रकल्पातील निवड झालेल्या व तपासणीतील उर्वरीत कागदपत्रे सादर करणेसाठी लाभार्थ्यांनी २३ एप्रिल २०२१ व दि.२६ एप्रिल २०२१ रोजी उपस्थित रहावे.
च-होली प्रकल्पातील निवड झालेल्या परंतु कागदपत्रांच्या छाननीसाठी उपस्थित न राहिलेल्या लाभार्थ्यांना १५ एप्रिल २०२१, १६ एप्रिल २०२१ व दि.१९ एप्रिल २०२१ रोजी कागदपत्रे छाननीसाठी उपस्थित राहता येणार आहे. तर यापूर्वि कागदपत्रे तपासणी झालेल्या मात्र उर्वरीत कागदपत्रे सादर न केलेल्यांना दि. २७ एप्रिल २०२१ व दि.२८ एप्रिल २०२१ रोजी आपली कागदपत्रे सादर करणेसाठी मुदत देणेत आल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. यासाठी लाभार्थ्यांनी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग, चिंचवड याठिकाणी आपली कागदपत्रे छाननीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करणेत येत आहे.