न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ०१) रोजी २११३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ११६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १० पुरुष पिंपरी (७०वर्षे), वाल्हेकरवाडी (५९ वर्षे), चिंचवड (५९ वर्षे), तळवडे (७६ वर्षे), निगडी (६५, ४० वर्षे), दिघी ( ३७ वर्षे), कासारवाडी (६८ वर्षे), पि. गुरव (८८ वर्षे), पिंपळे सौदागर (६९ वर्षे) : ०५ स्त्री – चिंचवड (६० वर्षे), चिखली (४६ वर्षे), निगडी (६० वर्षे), पिंपरी (८० वर्षे), काळेवाडी (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष- चाकण (६७ वर्षे) ०१ स्त्री- चाकण (५४ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ७ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १४२२५१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १२१४८३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २०१८ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – ३१४, ब – ३९९, क – २५८, ड – ३४१, इ – २०५, फ – ३११, ग – १७७, ह – १०७ एकुण – २११३.