- सायं. ६ ते स. ६ यावेळेत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध..
- अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा पुढील आदेशापर्यंत लॉक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२१) :- कोरोनाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील कार्यक्षेत्रासाठी पालिका आयुक्तांनी सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. यानुसार दिनांक ०३ एप्रिल २०२१ पासून सायंकाळी ६:०० ते सकाळी ०६:०० यावेळेत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या व्यक्तीस प्रत्येकी रक्कम रुपये १००० / – दंड असेल. मात्र यामधून जीवनावश्यक वस्तूंचा (दुध, भाजीपाला, फळे इ.) पुरवठा वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणारे आस्थापना / व्यक्तींना, कोविड लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या वाहनांना वगळण्यात तसेच ज्या उद्योगांचे शिफ्टमध्ये कामकाज चालते अशा संबंधित त्यांची करणाऱ्या वाहनांना सदर आदेशामधून वगळण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हॉटेल, रेस्टोरंट, बार, फूडकोर्ट हातगाडीवरील (Single Screen and Multiplex) स्विमिंगपूल व्यायामशाळा जिम इ. आस्थापना दि. ०३/०४/२०२१ पासून किंवा पुढील आदेशापर्यंत संपूर्णपणे बंद राहतील / घरपोच सेवा रात्री ११:०० सुरु राहील. महानगरपालिका क्षेत्रातील अंत्यसंस्काराशी या व्यतिरिक्त सर्व प्रकारचे सामाजिक धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रम उदघाटन, भूमिपूजन व लोक एकत्र येऊ शकतील कार्यक्रमास संपूर्णत बंदी असेल. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत संपूर्णतः बंद असतील.
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आठवडे बाजार किंवा पुढील आदेशापर्यंत संपूर्णतः बंद. मात्र मंडई सुरु राहतील. सामाजिक अंतर (Social Distancing व स्वच्छता (Sanitation) काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. मंडईतील विक्रेते तसेच आवश्यक व्यक्तिंची कोविड – १९ चाचणी करणे अनिवार्य राहील. महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (PMPML सेवा वगळून (स्वतंत्र आदेश) दि ०३/०४/२०२१ पासून संपूर्णतः बंद राहील. कार्यालये यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांकरिता वाहतूक व्यवस्था त्यांचे स्तरावर करावी. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, शैक्षणिक संस्था नियमित वर्ग दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यत बंद राहतील, मात्र शिक्षणास मुभा राहील. इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षा असल्यामुळे त्यांना वगळण्यात येत आहे. कोचिंग क्लासेस / कॉम्प्युटर क्लासेस ( MPSC , UPSC) दिनांक ३० एप्रिल बंद राहतील. MPSC , UPSC कोचिंग क्लासेस आसन क्षमतेच्या ५० % क्षमतेनुसार निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना / अटींच्या आधीन राहून सुरु राहतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक उद्याने, सोसायट्यांमधील क्लब पुर्णपणे बंद राहतील. संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक लागू राहतील, असे या आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे.