न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. ०२) रोजी २४६३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १५०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १५ पुरुष वाकड (३५ वर्षे), रावेत (६२ वर्षे), भोसरी (८४, ८०, ८० वर्षे), मोशी (३१, ३६ वर्षे), आकुर्डी (६९ वर्षे), यमुनानगर (६९ वर्षे), चिंचवड (५३, ६५ वर्षे), संत तुकारामनगर (६० वर्षे), नेहरुनगर (७६, ४० वर्षे), निगडी (८८ वर्षे) ०१ स्त्री – पिंपळे गुरव (५६ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष- नारायणगाव (५० वर्षे), हडपसर (७५ वर्षे) ०१ स्त्री- फातिमानगर (८२ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ४ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १४४७१४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १२२९९० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २०३४ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – ३२१, ब – ३८४, क – ३२१, ड – ३६१, इ – २८७, फ – ३०७, ग – २८६, ह – १९६ एकुण – २४६३.