- पिपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२१) :- मित्राला मारहाण होत असल्याने त्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी तरुण गेला. त्यावेळी त्याला सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. इंदीरानगर, चिंचवड स्टेशन येथे २६ मार्च रोजी ही घटना घडली.
विकास कांतीलाल मोरे (वय २९, रा. इंदीरानगर, चिंचवड स्टेशन), असे जखमी तरुणाचे नाव असून त्याने शनिवारी (दि. ३) याबाबत पिपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अनुराग दत्ता दांडगे (वय १९ इंदीरानगर, चिंचवड स्टेशन), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी आणि त्याचा मित्र आदित्य घाटोळे हे दोघेजण आशिष याच्या किराणा दुकानातून माल घेत होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीचा मित्र घाटोळे याला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यामुळे फिर्यादी यांनी भांडणात मध्यस्थी केली. याचा राग आल्याने आरोपी अनुराग याने फिर्यादीलाही लाथाबुक्क्यांनी व सिमेंटच्या गट्टने मारहाण करीत जखमी केले. “