- विभागांच्या नियमितपणे तपासणीचे विभागप्रमुखांना आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध कामांसाठी नागरिक येतात मात्र, त्यांची कामे वेळेवर होत नाहीत, ही बाब आयुक्त राजेश पाटील यांच्या निदर्शनास आलेली आहे.
त्यामुळे त्यांनी सर्वच विभागांच्या नियमितपणे तपासणीचे आदेश विभागप्रमुखांना दिले आहेत. तसेच तपासणी पथक आणि दक्षता पथकाच्या माध्यमातून ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेचे कार्यालयीन कामकाजाचे २६५ विभाग आहेत. नागरिकांची कामे होतात का होत नाहीत, त्याची कारणे काय याचा शोध आयुक्त घेणार आहेत. आठवड्यात एका विभागाची तपासणी होणार असून, त्यात कर्मचा-यांचे ओळखपत्र, गणवेश, हजेरी यासह कार्यालयातील दैनंदिन नोंदीची तपासणी होईल.