- मार्गदर्शक तत्वांचे पालन करून रक्तदान शिबीराच्या आयोजनाची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रक्ताची कमतरता भासत आहे. कोरोनाच्या आणि इतर आजारांच्या रुग्णांना रक्त द्यावे लागत आहे. कोरोनामुळे पूर्वी प्रमाणे मोठी रक्तदान शिबीर होत नसल्याची स्थिती आहे.
महाविद्यालय बंद आहेत. खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिले आहे. सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे रक्तदान शिबीर घेण्यास अडचणी यात आहेत. कोरोनाच्या भीतीने अनेक नागरिकांनी रक्तदान करण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. शहरातील सर्वच रक्त पेंढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
आदित्य बिर्ला रक्तपेढीत पुढील दोन ते तीन दिवस पुरेल एवढंच रक्त साठा उपलब्ध आहे. शहरातील सर्वात मोठी रक्तपेढी म्हणून वायसीएम रक्तपेढी ओळखली जाते. पुढील दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा सध्या उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. प्रसुतीच्या वेळीही रक्ताची गरज लागते. ज्यांना रक्तदान करणे शक्य आहे, त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन रक्तपेढ्या आणि सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.