- शहरात कार्यालयाच्या विस्तारासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात सध्या नोंदणीसाठी ७ सहायक दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. शहराचा वाढता विस्तार पाहता आणखी तीन कार्यालय नव्याने सुरू करण्याची मागणी होत आहे. त्याला अनुसरून तीन कार्यालयांचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे.
त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याने या कार्यालयांसाठी आवश्यक जागेची मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे करण्यात आली आहे. हवेली अंतर्गत आकुर्डी, चिंचवड, भोसरी येथे प्रत्येकी एक तर, पिंपरी आणि कासारवाडी या ठिकाणी कार्यालय सध्या सुरू आहेत.
तेथे जमीन, खरेदी – विक्री व्यवहाराची नोंद केली जाते. खरेदी खत, सदनिकांचे करारनामे, भाडेकरार, विकसन करारनामा, मृत्यूपत्र नोंदणी, बक्षीस पत्र आदी विविध दस्ताची नोंद होते. थेरगाव, चिखली, रहाटणी येथे सहायक दुय्यम निबंधक कार्यालय सुरू व्हावे, अशी मागणी होत आहे.
















