न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २४ डिसें.) :- नगरसेवक चंद्रकांत नखाते व भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक २७ रहाटणीतील वर्धमान हाईट्स आणि क्रिस्टल पार्क परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी पॅडल सायकलच्या नविन स्टेशनचा शुभारंभ करण्यात आला आहे.
नगरसेविका सुनिता तापकीर, सविता खुळे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर यांच्या उपस्थितीत रविवार (दि. २३) रोजी या पॅडल सायकलच्या नविन स्टेशनचा उद्घाटन समारंभ पार पडला.
यावेळी चंद्रकांत नखाते म्हणाले की, खास प्रभागातील नागरिकांसाठी ही संकल्पना राबवली आहे. नागरिकांनी आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व आपला परिसर प्रदुषण विरहीत ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक सायकल वापरण्याचा संकल्प करावा.
भाजपा युवा मोर्चाचे राज तापकीर म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांनी आरोग्यकडे लक्ष देणे फार गरजेचे बनलेले आहे. शरीराचे वाढते वजन आरोग्य बिघडवीत आहे. त्यासाठी वेळात वेळ काढून व्यायाम करणे गरजेचे आहे. ज्यांना व्यायामासाठी सवड मिळणार नाही त्यांनी सायकलचा वापर जास्तीत जास्त करण्याचे आवाहन राज तापकीर यांनी केले आहे.