न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ०८) रोजी २३५१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १४५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ६ पुरुष मोशी ( ५८ वर्ष ), दिघी ( ४० वर्ष ), काळेवाडी ( ६९ वर्ष ), चिंचवड ( ७६ वर्ष ), पिंपळे सौदागर (६८ वर्षे), देहूरोड ३२ वर्षे, ९ स्त्री – पिंपळे सौदागर (६९ वर्ष), पिंपळे गुरव (६० वर्ष), थेरगाव (८४ वर्ष), पिंपरी (७४ वर्ष), मोशी ४५ वर्षे, चिंचवड (७४, ७५ वर्ष), प्रेम लोक पार्क ( ९६ वर्ष ), भोसरी ( ७२ वर्ष ), येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु, पिंपरी चिंचवड मनपा हद्दीबाहेरील मधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ४ पुरुष- वडगाव शेरी ( ४८ वर्षे ), कोरेगाव पार्क ( ८७ वर्ष ), औंध (६२ वर्ष), खेड (४५ वर्ष), ०२ स्त्री – कुसगाव ( ७१ वर्षे ), रविवार पेठ ( ७५ वर्ष ), येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १० मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १६१११९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १३३८३९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २१२२ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २६२, ब – ३६७ , क – २४०, ड – ५२२, इ – २५२, फ – २६०, ग – २४४ ह – २०४ एकुण – २३५१.


















