- प्रतिभा महाविद्यालयात ‘बिलिव्ह इन युवर सेल्फ’ ऑनलाईन कार्यशाळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२१) :- चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयातील कॅाम्प्युटर अॅप्लिकेशन विभागाच्या वतीने ‘बिलिव्ह इन युवर सेल्फ’ या तीन दिवसीय ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चंद्रन मार्गदर्शन करताना बोलत होते.
यंदाच्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहे. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत होणे, मोबाईल नादुरुस्त होणे, नेटवर्कचा अभाव, एकटेपणा जाणवणे, चार लोक काय बोलतील अविवेवेकी मनात विचार येणे, त्यात विद्यार्थ्यांना द्यावी लागणारी परिक्षा या चिंतेने अनेक विद्यार्थी, पालक ग्रासले गेले आहेत. यासाठी सकारात्मक दृष्टीकोन अंगिकारावा, परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या विशेष पुढाकाराने तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया कार्यक्रमाचे संयोजक व विभाग प्रमुख प्रा. हेमलता चव्हाण, प्रा. अपर्णा कोरडे, प्रा. अमृता भंडारी आदींनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना पुणे येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. किरण शहा यांनी प्राणायम हास्य योगाचे महत्त्व विशद केले. तर, सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनी आर. यांनी ध्यान धारणा व तणावमुक्ती बाबत मार्गदर्शन करून मनातील भिती कशी दूर करावी, एकाग्रता कशी वाढवायची, सकारात्मक विचारसरणी कशी अंगीकरावी येणार्या परिक्षेला सकारात्मक दृष्टीकोनातून कसे सामोरे जावे, याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला, त्यांच्या अनेक प्रश्नांना व्याख्यात्यांनी समर्पकपणे उत्तरे दिली.