- तब्बल १०८ नागरिकांची कोविड टेस्ट; ७ व्यक्ती पॉझिटिव्ह..
- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२१) :- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती व पिंपरी चिंचवड महापालिका आकुर्डी रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने कोविड -१९ करिता “रॅपिड अँटीजेन टेस्ट” कॅम्प चे आयोजन कै. संजय काळे क्रीडांगण हॉल, सेक्टर २८ -प्राधिकरण येथे रविवार ११ एप्रिल रोजी करण्यात आले. शहरात प्रथमच एका संस्थेच्या वतीने नागरी आरोग्य हिताकरिता कोविड टेस्ट चा उपक्रम राबविण्यात आला.
कोविड कॅम्प आयोजनासाठी माजी उपमहापौर नगरसेविका शैलजा मोरे, आकुर्डी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास बोरकर, डॉ. दीपक चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसेन अष्टेकर, संपर्क प्रमुख विजय मुनोत, आकुर्डी- गंगानगर विभाग प्रमुख संतोष चव्हाण, समिती अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते.
सकाळी १० वाजता कोविड टेस्ट ला सुरुवात करण्यात आली. आकुर्डी रुग्णालय वैदयकीय पथकातील डॉ. वैभव मारुती कर्णे, डॉ. रुपेश दिनकर दळवी, डॉ. स्वप्नील किसन जोशी, डॉ.शहनवाज रफिक मणियार, किरण विठ्ठल कमलापुरे, बाळासाहेब लक्ष्मण वडते, आसिफ शेख, हृषीकेश भालेकर, अभिजित अलटे, अमित साळवे यांनी ११४ नागरिकांची कोविड टेस्ट केली. यामध्ये ७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. सातही रुग्णांना डॉक्टरांनी कोरोना संदर्भात समुपदेशन केले व मार्गदर्शन केले तसेच पुढील उपचाराकरिता पाठविले.
या कॅम्प आयोजनाकरिता विशेष परिश्रम करणारे गंगानागर आकुर्डी विभागाचे प्रमुख संतोष चव्हाण म्हणाले,” आकुर्डी प्राधिकरण परिसरामध्ये अनेक नागरिकांचे कोविड टेस्ट साठी फोन येत होते. महापालिका वगळता टेस्टिंग करिता शहरातील कोणतीच संस्था पुढाकार घेत नव्हती, नागरिकांना कोविड टेस्ट च्या ठिकाणी गर्दीचा व विस्कळीत नियोजनाचा अनुभव येत होता. त्यामुळे अनेक परिसरातील नागरिक कोविड टेस्ट पासून वंचित रहात होते. त्याचप्रमाणे आकुर्डी येथील खाजगी कंपनी मध्ये सुद्धा कामगारांना कोविड टेस्ट रिपोर्ट आता आवश्यक करण्यात आला आहे. त्याकरिता संस्थेच्या वतीने कॅम्पचे नियोजन करण्यात आले.”
समिती अध्यक्ष विजय पाटील पाटील म्हणाले,” शहरात कोविड टेस्ट चा वेग वाढविणे आवश्यक आहे. कोरोना कम्युनिटी स्प्रेड च्या मार्गावर आहे. अश्या गंभीर वातावरणात रॅपिड अँटीजेन टेस्ट ह्या प्रत्येक प्रभागात मोठ्या संख्येने करणें आता गरजेचे होऊन बसले आहे. त्याकरता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती आणि महापालिका आकुर्डी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड टेस्ट कॅम्प चे नियोजन करण्यात आले. परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने तपासणी साठी पोहचले. अश्याच पद्धतीने प्रत्येक प्रभागात सार्वजनिक संस्थांनी पुढाकार घेऊन कॅम्प चे नियोजन केले तर कोरोना बधितांचे वेळीच निदान होऊन त्यांना तातडीने उपचार मिळतील आणि शहरातील मृत्यू दर कमी होईल.”
डॉ. वैभव कर्णे म्हणाले,” अतिशय शिस्तबद्ध,व प्रशासनाचे कोविड नियमांचे पालन करून आजच्या कॅम्पचे नियोजन प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने केले. लोकसहभागाशिवाय कोरोनावर मात करता येणे शक्य नाही.समाजातील सर्व सुज्ञ नागरिक, कोविड योद्धा स्वयंसेवक, सार्वजनिक संस्था,पोलीस प्रशासन आणि महापालिका वैद्यकीय विभागाचे सर्व कर्मचारी मिळून एकत्रित अशीच कोविड तपासणी मोहीम येत्या महिनाभरात राबविल्यास मोठ्या संख्येने रुग्णांना दिलासा मिळेल. व वेळीच त्यांना उपचार मिळतील.
कॅम्प मध्ये सहभाग घेणाऱ्या या महापालिकेच्या आरोग्य दूतांचा समितीच्या वतीने प्रसेन अष्टेकर, विजय मुनोत यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.