न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवार (दि. १२) रोजी २१८८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २४३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १३ पुरुष – पिंपळे गुरव (४५,८७ वर्षे), रुपीनगर (७० वर्षे), चिखली (४८ वर्षे), पिंपरी (६५, ७२ वर्षे), कुंदननगर (७३ वर्षे), च-होली (७२ वर्षे), चिंचवड (६१ वर्षे), थेरगाव (५१ वर्षे), दिघी (५७ वर्षे), निगडी (६९ वर्षे), रहाटणी (६६ वर्षे), : ०८ स्त्री – किवळे (६४ वर्षे), काळेवाडी (४० वर्षे), थेरगाव (८५ वर्षे), चिखली (३८ वर्षे), आकुर्डी (७४ वर्षे), पिंपरी (७१,३२ वर्षे), पिंपळे गुरव (७४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष- बिबवेवाडी (६५ वर्षे), मुळशी (७७ वर्षे), धानोरी (६५ वर्षे), खेड (६९ वर्षे), : ०९ स्त्री – औंध (७२ वर्षे), बावधन (७५ वर्षे), येरवडा (५५, ५७वर्षे), कोथरुड (४२, ७६ वर्षे), कात्रज (३९ वर्षे), खेड (६४ वर्षे), कोंडवा (६२ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १५ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १६९९६४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १४२४६४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २१९८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – ३६९, ब – ३५८, क – २४४, ड – ३५८, इ – २३७, फ – ३४६, ग – २२७, ह – २७०, एकुण – २१८८