- वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२१) :- दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील एक लाख ६२ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना ७ एप्रिल रोजी वाकड येथे उघडकीस आली.
नितीन गंगाधर चौधरी (३९, रा. दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी चौधरी यांचे घर गेल्या सहा महिन्यांपासून बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून त्यांच्या घरातील सोन्या – चांदीचे दागिने आणि वस्तू असा एकूण एक लाख ६२ हजार १०० रुपये किमतीचा माल चोरून नेला.
















