- शहरात आज २०८६ जणांना बाधा; ६१ रुग्णांचा मृत्यू तर, २११० जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. १५) रोजी २०८६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २११० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २१ पुरुष : ताथवडे (४८ वर्षे), आजमेरा (६० वर्षे), थेरगाव (७१ वर्षे), कासारवाडी (५८ वर्षे), पिंपळे सौदागर (६४ वर्षे), सांगवी (७३, ५६ वर्षे), रहाटणी (६५ वर्षे), चिखली (६५,४६, ५९ वर्षे), पिंपळे गुरव (५५ वर्षे), वाकड (७३ वर्षे), बोपखेल (३२, ६४ वर्षे), निगडी (४८, ८५ वर्षे), चिंचवड (८२ वर्षे), दिघी (६६ वर्षे), पिंपरी (६५ वर्षे), तळवडे (३५ वर्षे) : १५ स्त्री – दापोडी (४८, ५३ वर्षे), चिंचवड (६० वर्षे), भोसरी (२९, ७१ वर्षे), काळभोरनगर (५९ वर्षे), संत तुकारामनगर (३४ वर्षे), पिंपळे गुरव (६९,६२ वर्षे), मोशी (६४ वर्षे), थेरगाव (७७ वर्षे), घरकुल (७५ वर्षे), वाकड (७० वर्षे), पिंपरी (४१ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १५ पुरुष- खेड(८०, ८५ वर्षे), पाषाण (३८ वर्षे), धानोरी (५६ वर्षे),लोनावळा (४२ वर्षे), चाकण (५०, ७२ वर्षे), वडगाव शेरी (६९ वर्षे), वडगांव बुद्रुक (६५ वर्षे), हिंजवडी (६३ वर्षे), पुणे (५३, ८०, ५०, ५२वर्षे), आळंदी (५२वर्षे) : १० स्त्री – मालवडी (५० वर्षे), कोंढवा (६४ वर्षे), हडपसर (५६ वर्षे), जुन्नर (७५ वर्षे), पुणे (७३वर्षे), वारजे (६५ वर्षे), धायरी (७५ वर्षे), औंध (५३ वर्षे), सासवड (५७ वर्षे),येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात २३ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १७५४०५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १५०७३८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २२८५ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २३६, ब – ३८६, क – १७९, ड – ३०६, इ – १७८, फ – ३३८, ग – २७०, ह – १९३ एकुण – २०८६.
















