- शक्य होईल त्या प्रमाणात मदत करण्याचे दिले आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२१) :- मागील काही दिवसांपासून करोनाबाधिताची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लाॅकडाऊनच्या सक्ततेने परप्रांतीय मजुर कामगार हवालदिल झाला आहे. बांधकाम कामगार सेना अध्यक्ष जयंत शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील विविध बांधकाम प्रकल्पावरील परप्रांतीय बांधकाम कामगार यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
ते म्हणाले की, मागील वर्षी मार्चमध्ये अचानक लाॅकडाऊन झाल्यामुळे अनेक कामगारांची घरी जाण्याची आबाळ झाली. कित्येक जण तर जिवाला मुकले. सध्याही त्यापेक्षा वेगळी अशी काही परिस्थिती नाही. लाॅकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय कामगारांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केलीय. पण करोना संसर्गाचा धोका हा आणखीनच वाढत आहे.
सध्याच्या स्थितीत ते जिथं रहात आहेत तिथेच कसे सुरक्षित राहतील याबद्दल त्याचं समुपदेशन केल. तसेच त्यांना शक्य होईल त्या प्रमाणात मदत करण्याचे आश्वासन दिले.