- भाजपा युवा मोर्चाच्या मागणीला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२१) :- जनमाणसांची भावना लक्षात घेत सकारात्मक विचार करून आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेद्वारा आज शुक्रवारी मोफत प्लाज्मा पुरवठा करण्याचा लोकहिताचा निर्णय घेण्यात आला.
पहिला लाटेच्या तुलनेत आता राज्य सरकारच्या नियमानुसार प्लाझ्मासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रक्तपेढीत सहा हजार रुपये द्यावे लागत आहे. अशावेळी आधीच खाजगी रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या लोकांवरती हा अधिकचा आर्थिक भार पडत होता. याचीच दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चा शहराच्या वतीने भाजपा आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे व स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्याकडे प्लाझ्मा मोफत करण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली होती.
या मागणीला खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले असून भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले आहे.