- उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२१) :- करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील प्रत्येक आमदारांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित आमदारांना आपापल्या मतदारसंघात हा निधी खर्च करता येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.
पुण्यातील विधान भवन येथे पार पडलेल्या करोना आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांनी निर्बंध पाळून प्रशासनास सहकार्य करावं, अन्यथा मागील वेळप्रमाणे कडक लॉकडाउन जाहीर करावा लागेल, असं इशारा देखील दिला.
नागरिकांनी जर योग्य प्रतिसाद दिला नाही. तर नाइलाजास्तव मागील लॉकडाउन सारखी वेळ आणावी लागेल. तशी वेळ येऊ देऊ नये अशी आमची नागरिकांना विनंती आहे.


















