- मृतदेहाच्या सोयीसाठी तात्पुरत्या मर्चुरी रूमची उभारणी करा..
- नगरसेवक कैलास बारणेंची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अॅम्बुलन्समध्ये स्मशान भूमीत अंत्यसंस्कारासाठी मृत रुग्णास बराच वेळ थांबावे लागत आहे.
त्यामुळे अॅम्बुलन्स अडकून पड़त आहे. नागरिकांना लवकर अॅम्बुलन्स उपलब्ध होत नाही. तसेच मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना स्मशानभूमी बाहेर तासंतास ताटकळत बसून राहावे लागते. स्मशानभूमी बाहेर तात्पुरत्या स्वरूपाची मर्चुरी रूमची उभारणी करावी.
मर्चुरी रुममुळे मृतदेह त्या मर्चुरी रुममध्ये ठेवता येतील. त्यामुळे अॅम्बुलन्स ही नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध होण्यास मदत होईल. नागरिकांच्या अडचणी दूर होतील, त्यासाठी तत्काळ स्मशान भूमीबाहेर मर्चुरी रुमची उभारणी करावी, अशी मागणी नगरसेवक कैलास बारणे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


















