- खासगी आयसीयूतील रुग्णांना आता पालिका रुग्णालयात ‘नो एन्ट्री’…
- उपचाराधीन कोविड रुग्णांचा बालेवाडीत ‘Step Down’..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता काही व्यक्तींना कोरोना सदृश्य लक्षणे जाणवतात. परंतू, कोरोनाची टेस्ट होईपर्यंत कोरोना पॉझिटीव्ह किंवा निगेटिव्ह हे निश्चित होत नाही. तोपर्यंत त्या व्यक्तीस उपचार मिळण्यात अडचण येत आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड मनपाने चिंचवड येथील निरामय हॉस्पिटल हे कोरोना सदृश्य रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. अशा रुग्णांवर रुग्णालय उपचार सुरु करतील व त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार पध्दती निश्चित करण्यात येईल. पालिकेच्या नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड मनपातील खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण ICU मध्ये आहेत. काही कारणास्तव सदरचे रुग्ण मनपाच्या ICU मध्ये स्थलांतरीत करतात. त्यामुळे मनपाच्या अतिदक्षता विभागावरती ताण येत आहे. तसेच सदरचा रुग्ण अत्यंत Critical Condition मध्ये असल्याने तो दगावल्यास मनपास सदर बाबत स्पष्टीकरण द्यावे लागतात. तरी सद्यस्थितीमध्ये मनपाच्या अतिदक्षता विभागामध्ये सुध्दा जागा शिल्लक नाही व जे रुग्ण मनपाच्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्यांनाच अतिदक्षता विभागामध्ये घ्यावे लागतील. त्याची संख्या सुध्दा मोठी आहे. त्यामुळे यापुढे खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांना मनपाच्या अतिदक्षता विभागामध्ये भरती न करुन घेण्याचा निर्णय मनपाने घेतलेला आहे.
बालेवाडी मनपाच्या विविध रुग्णालयांमध्ये वाय.सी.एम., जम्बो कोविड सेंटर, अँटो क्लस्टर सेंटर इ. या ठिकाणी रुग्ण बरे होत आलेले असतात. परंतू, त्यांना विलगीकरणाची आवश्यकता असते अशा रुग्णांना टप्प्या – टप्प्याने सामान्य परिस्थितीमध्ये आणावे लागते, अशा रुग्णांसाठी बालेवाडी येथील कोविड केअर सेंटर ( CCC ) येथे १५० बेड्सची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. त्या ठिकाणी Step Down रुग्णांना ठेवणेत येईल अशा प्रकारची व्यवस्था मनपामार्फत करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड मनपामध्ये १०१ हून अधिक कोविड रुग्णालय म्हणून मनपाने मान्यता दिलेली आहे. सदर रुग्णालयांनी त्यांच्याकडील बेड्सची संख्या मनपास कळवणे आवश्यक आहे. काही ठिकाणी त्याबाबत मनपास सहकार्य केले जात नाही असे निदर्शनास आलेले आहे. त्यासाठी रुग्णालयांना मा. आयुक्त यांच्या स्वाक्षरीने लेखी सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. यापुढे अशा रुग्णालयांनी मनपास सहकार्य न केल्यास साथ रोग अधिनियम १९८७, आपत्ती व्यवस्था अधिनियम २००५ व महाराष्ट्र कोविड उपाययोजना अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद देण्यात आलेली आहे.


















