- कॉल सेंटरची उभारणी; डॉक्टर करणार रुग्णांची विचारपूस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रूण हे गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन) आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कॉल सेंटर उभारण्यात आले आहे.
आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. यामधून रुग्णांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली जाणार आहे. तसेच त्यांच्या घरच्यांनाही मार्गदर्शन केले.
शहरामध्ये आज १४ हजार ९८५ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. तर ७०२२ रुग्णांवर महापालिकेच्या व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच उपचार व मार्गदर्शन देण्यासाठी कॉल सेंटर उभारण्यात आले आहे. कॉल सेंटरमधून रुग्णांला फोन गेल्यानंतर त्यांची तब्येतीची चौकशी केली जाणार आहे. त्यामध्ये काही लक्षणे आहेत का, सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी असा त्रास आहे का. याबाबत चौकशी केली जाणार आहे. तसेच डॉक्टरांसोबत रुग्णाला बोलायचे असेल तर फोन जोडून देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या १० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.


















