न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १७) रोजी २९८२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २७५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २२ पुरुष सांगवी (५१, ७४ वर्षे), पिंपरी ( ८२, ५५ वर्षे), यमुनानगर (४९ वर्षे), चिंचवड (५७, ४३, ८२, ७० वर्षे), पिं. गुरव (५०, ५४, ४१, ३८ वर्षे), काळेवाडी (५३, ७८, ७६ वर्षे), थेरगाव (६५ वर्षे), चिखली (८०, ५३ वर्षे), भोसरी४३,६०,६० वर्षे), १० स्त्री- चिखली (६०, २१ वर्षे), पिं. गुरव (७० वर्षे), भोसरी (३७ वर्षे), च-होली (६५ वर्षे), यमुनानगर (२७, ६६ वर्षे), दिघी (७३ वर्ष), पिंपरी (७४ वर्षे), काळेवाडी (५४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १८ पुरुष- पारणे (३५ वर्षे), फुरसुंगी (८१ वर्षे), मुळशी (४४, ८८ वर्षे), माळवाडी (६३ वर्षे), लोहगाव (३५ वर्षे), देहुगाव (६२ वर्षे), वारजे (७१ वर्षे), पुणे (५९, ७८ वर्षे), लोहगाव (७३ वर्षे), कोरगाव पार्क (८८ वर्ष), खराडी (७४ वर्षे), नवी मुंबई (६८ वर्षे), येरवडा (७६ वर्षे), खेड (६८ वर्षे), बोपोडी (७६ वर्ष), ०४ स्त्री- खडकी (७३ वर्षे), शिरुर (५८ वर्षे), पुणे (८०,७६ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १८ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १८०९१६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १५६३६६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २३४९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २१४, ब – ४३६, क – २८६, ड – ६३७, इ – २९१, फ – २४८, ग – ४९१, ह – ३५२ एकुण – २९८२.


















