- पालिका लसीकरण केंद्र बंद करण्याच्या तयारीत?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात पंधरा दिवसाचा लॉकड़ाऊन केल्याने लसीकरणासही खोडा बसला आहे. नोंदणीतील तांत्रिक अडथळे, लस साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण मंदावले आहे. यामुळे शहरातील १६ लसीकरण केंद्र बंद केली आहेत. औदयोगिकनगरीत १६ जानेवारीपासून लसीकरण झाले. शासकीय आणि खासगी अशी एकूण शंभर केंद्र तयार केली होती. मात्र, त्यापैकी १६ केंद्र बंद करावी लागली आहे.
शासकीय ६२ आणि खासगी २२ लसीकरण केंद्र सुरू आहेत. आत्तापर्यंत २ लाख २६ हजार २४६ जणांना लसीकरण केले आहे. त्यात ४५ ते ६० वर्षावरील २ लाख २५ हजार ७१ नागरिकांनी दिली आहे. लसीकरण वाढावे यासाठी शहरात शंभर केंद्र सुरू केली होती. केंद्राकडून लस मिळत नसल्याने लसीकरण थंडावले आहे. त्यामुळे दिवसाला पंचवीस हजार लसीकरणाचे उद्दीष्ट थांबले आहे.
४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटाला लस देण्यास सुरुवात एक एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. एकूण लसीकरणात या महिन्यातील लसीकरणाचा वेग चांगला आहे. लसीकरण मोहीमेत प्रमुख अडचण म्हणजे केंद्र सरकारकडून लस पुरेशी मिळत नाही. मिळेल त्या साठयात महापालिकेला नियोजन करावे लागत आहे. खासगी केंद्रांपेक्षा शासकीय केंद्रामध्ये लसीकरणाचा वेग अधिक असल्याचे दिसून आहे. लसीकरणात ज्येष्ठ नागरिक उत्साही असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
महापालिकेच्या वतीने सर्वच केंद्र सुरू आहेत. शनिवारी साडेआठ हजार लस उपलब्ध होती. त्यामुळे काही केंद्रावर दुपारनंतर लस कमी पडली होती. लस पुरवठा कमी झाल्यास त्याचा परिणाम लसीकरणावर दिसून येतो. काल २५ हजार लस आल्या आहेत. त्यात २० कोवीशिल्ड आणि ५ हजार कोवेक्सिन आहेत. आज सर्वच केंद्रावर लसीकरण सुरुळीत होते.
– डॉ. वर्षा डांगे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, पिं. चिं. मनपा..


















