- सट्टा लावणाऱ्याचे पोलिसांना ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन माध्यमातून सट्टा लावणाऱ्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांना मारहाण केली. तीन जणांना अटक केली. आकुर्डी येथे शुक्रवारी (दि.१६) रात्री ही घटना घडली.
श्रीपाद मोहन यादव (वय २२, रा. पंचतारानगर, आकुर्डी), अमित रामपाल अगरवाल (वय ३५.रा. निगडी), नितीश रामदास काळे (वय २१, रा. पंचतारानगर, आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्यासह किशोर रेहाल उर्फ किशोर भाई (रा. चेंबूर, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक विजय तेलेवार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या संघांदरम्यानच्या सामन्यावर आरोपी लोटस ऑनलाइन सट्टा हा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पसकाला मिळाली. पोलिसांनी आकुर्डी परिसरात सापळा लावून कारवाई केली. आरोपी ऑनलाइन सट्टा घेत असताना मिळून आले. त्यामुळे आरोपीवर कारवाई करत होते.