- कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे यात्रा रद्दचा प्रशासनाचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ल्याची आई एकवीरादेवीची यात्रा कोरोनाचा वाढता धोका पाहता रद्द करण्यात आली आहे. याविषयीची माहिती देवस्थानचे प्रशासकीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड यांनी दिली.
सोमवारी (दि. १९) सायंकाळी देवस्थान पुजारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत परंपरेनुसार देवीची पालखी काढण्यात येणार आहे; तसेच धार्मिक कार्यक्रम घेऊन यात्रा साजरी करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गास अटकाव म्हणून सध्या राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा विचार करता मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी एकवीरादेवी मंदिर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
सर्व धार्मिक कार्यक्रम रीतीरिवाजाप्रमाणे केले जाणार असून पालखीदेखील पुजारी व कर्मचारी काढणार आहेत. एकवीरादेवी मंदिर व परिसरात कोणालाही प्रवेश नसून लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


















