- कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण होणे आवश्यक; पालिकेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- महापालिका परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. तीन महिन्यात तीन लाख नागरिकांना लसीकरण केले आहे. अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त व आरोग्य वैदयकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम दि. १६ जानेवारीपासून सुरू केली आहे. सुरुवातीला नोंदणीकृत आरोग्य सेवा देणारे व फ्रेंन्ट लाईन वर्कर, वय वर्ष ४५
वरील व्यक्ती यांचे लसीकरण सुरू आहे. महापालिकेकडून दि. २३ मार्चला एक लाखाचा लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला होता.
कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण होणे आवश्यक आहे. लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वैद्यकिय विभागाकडून करण्यात येत आहे. शहरामधील वय वर्ष ४५ वरील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण केल्यानंतर मास्क, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर या गोष्टी पाळणे बंधनकारक आहे, असे डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैदयकिय अधिकारी यांनी सांगितले.


















