- पालिका महत्वाच्या बाबींची करणार पडताळणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- कोरोनाच्या उद्रेकामुळे आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी खासगी प्रयोगशाळांमध्ये संशयित रुग्णांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे खासगी यंत्रणा कोलमडली आहे. खासगी प्रयोगशाळांबाबत नागरिकांच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. त्याची दखल घेत महापालिका आयुक्तांनी खासगी प्रयोगशाळांच्या पर्यवेक्षणासाठी १० कनिष्ठ अभियंत्यांची नेमणूक केली आहे.
रुग्णांचे घेण्यात आलेले स्वेब महापालिकेच्या आणि खासगी मान्यताप्राप्त १२ लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले जातात. अश्या प्रत्येक ठिकाणी महापालिकेचा एक कर्मचारी नियुक्त करुन त्यांच्यामार्फत महत्वाचा बाबींची पडताळणी केली जाणार आहे.
महापालिकेचे लॅब वगळता खासगी लॅबमध्ये आरटीपीसीआर आणि इतर तपासणी करण्याकरिता आकारले जाणारे शुल्क हे शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य आहे का? याची तपासणी करण्यात येणार आहे. आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी रुग्णांना कोणकोणत्याअडचणी येतात? निश्चित केलेल्या शुल्का व्यतिरिक्त रुग्णांकडून पैशाची मागणी केली जात आहे का? प्रत्येका लॅबमध्ये दररोज किती तपासण्या केल्या जातात? नियमित तपासणी व्यतिरिक्त त्यामध्ये आणखी वाढ करणे शक्य आहे का? लॅब मार्फत तपासणीचा देण्यात येणारा अहवाल वेळेवर देण्यात येतो, नाही याची तपासणी करणे. तपासणी केंद्रांवर नागरिकांशी सौजन्याने वागणूक देण्यात येते का? याचे पर्यवेक्षण करण्यात येणार आहे. या कामकाजाच्या दैनदिन अहवाल नियंत्रण अधिकारी स्मिता झगड़े यांच्याकडे नियमितपणे सादर करावेत असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.


















