न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- कुदळवाडी प्रभाग क्रमांक ११ शाळा क्रमांक ८९ नवीन इमारत कुदळवाडी या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करुन नवीन शाळेची इमारत बांधण्यात आली आहे. लॉकडाऊन अभावी सर्व शाळा बंद आहेत. तसेच शाळा इमारत नवीन असल्याने त्या ठिकाणी मद्पी, तळीराम अशी लोक त्या इमारतीचा दुरूउपयोग करीत आहेत.
महानगरपालिकाने या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावेत. यामुळे त्या ठिकाणी कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही. अनेक वेळा या ठिकाणी वस्तूचे नुकसान होणाचे प्रकार घडले आहेत.
सुरक्षा विभागाने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावे. यासाठी स्वी. सदस्य दिनेश यादव यांनी आयुक्त राजेश पाटील यांना लेखी पत्र दिले. सभागृह नेते नामदेव ढाके, फ प्रभाग सभापती कुंदन गायकवाड आदी उपस्थित होते.


















