- सिलिंडरची गाडी चिखलामुळे या मार्गावर पलटी..
- सर्वसामान्यांचा जीव गेल्यावर रस्त्याचे काम होणार? – हरेश नखाते…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- काळेवाडी-पिंपरी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. गजानन नखाते पथ ते तापकीर मळा चौक या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रविवारी (दि. १८) रोजी सकाळच्या सुमारास जगदाळे हॉस्पिटलसमोर सिलिंडरची गाडी चिखलामुळे या मार्गावर पलटी झाली. त्यातील दोन कामगार थोडक्यात बचावले.
नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. स्थानिक नगरसेवकांचे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरेश नखाते ह्यानी दुसरी एखादी दुर्घटना होण्यापूर्वी रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. एखाद्या सामान्य नागरिकाचा जीव गेल्यावर रस्त्याचे काम मार्गी लागणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


















