न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. १९) रोजी २२७९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १९८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १३ पुरुष – चिखली (४४, ५२ वर्षे), पिं. गुरव (५२.५७ वर्षे), बोपखेल (५६ वर्षे), वाकड (५३ वर्षे), रहाटणी (५६ वर्षे), निगडी (८७ वर्षे), दिघी (८१ वर्षे), मोशी (४७ वर्षे), आकुर्डी (३२ वर्षे), कासारवाडी (७५ वर्षे), संत तुकारामनगर (८२ वर्षे), १९ स्त्री – पिं. निलख (५७ वर्षे), चिंचवड (६८ वर्षे), दिघी (५९, ८६ वर्षे), पि. सौदागर (६१ वर्षे), थेरगाव (६१, ६५ वर्षे), चिखली (७२,३८,५० वर्षे), निगडी (४९ वर्षे), दापोडी (६२ वर्षे), मोरवाडी (६५ वर्षे), रहाटणी (६२, ४२ वर्षे), रुपीनगर (३५ वर्षे), संत तुकारामनगर (५८ वर्षे), रावेत (६८ वर्षे), वाकड (४३ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १६ पुरुष- खेड (७६,७६ वर्षे), खडकी (६६ वर्षे), पुणे (७५,५५ वर्षे), अमबोली (४६ वर्षे), सिंहगड रोड (५४ वर्षे), धाणोरी (४३ वर्षे), वडगाव शेरी (५६ वर्षे), चाकण (५० वर्षे), बावधन (६१ वर्षे), हडपसर (६७ वर्षे), बोपाडी (७४ वर्षे), मुळशी (५७ वर्षे), नाशिक (५१ वर्षे), अहमदनगर (४४ वर्षे), ०६ स्त्री – बाणेर (५३ वर्षे), वारजे (५९ वर्षे), विश्रांतवाडी (६५,७० वर्षे), खडकी (६४, ३५ वर्षे), येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १७ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १८६०२५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १६०६६४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २४१२ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – १९६, ब – ३४४, क – २४५, ड – ४८६, इ – ३०५, फ – २०२, ग – २३९, ह – २६२ एकुण – २२७९.