- महापौर उषा ढोरे यांची पालिका आयुक्तांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- महापालिकेने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड शहरात कोविड -१९ लसीकरण मोहिम सुरु केली आहे. शहरातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. दि.१ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्ष व त्यापुढील सर्व नागरिकांनी कोविड -१९ लस घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
सध्या कोविड -१९ विषाणूची दुसरी लाट व वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेचे सर्व नगरसदस्य, शहरातील पत्रकार, ४५ वय वर्षेच्या आतील कोविड योध्दे, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, एन.जी.ओ यांचे प्रतिनिधी / सदस्य हे सर्व आपापल्या परीने या संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती, कोरोना रुग्णांना हॉस्पिटल्स, औषधे तसेच इतर तद्अनुषंगिक व्यवस्थेसाठी स्वतःच्या आरोग्याची जोखीम पत्करून धावपळ करत आहेत.
महापालिकेचे सर्व नगरसदस्य, शहरातील पत्रकार, ४५ वय वर्षेच्या आतील कोविड योध्दे, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, एन.जी.ओ यांचे प्रतिनिधी / सदस्य यांच्या आरोग्याचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन या सर्वांचे कोविड -१९ लसीकरण करणेकामी संबंधितांस निर्देश द्यावेत, अशी सूचना महापौर उषा माई ढोरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.