- चाचणी केंद्रामध्ये वाढ करण्याची नागरिकांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील करोना चाचणी केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे अनेक नागरिकांना टोकन घेण्यासाठी तासन तास थांबावे लागते. प्रचंड होणाऱ्या गर्दीमुळे करोनाचे नियम पादळी तुडविले जात असल्याने रांगेतच करोनाची बाधा होण्याची शक्यता निर्माण व होत आहे. त्यामुळे चाचणी केंद्रामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे.
एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील पाच ते सात जणांची तपासणी केली जात आहे. महापालिकेतर्फे आकुर्डी दवाखाना, तालेरा, वायसीएमएच, खराळवाडीतील बालभवन, पिंपरीतील जिजामाता रूग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, यमुनानगर, वस्ती दवाखाना, थेरगाव आणि सांगवी रुग्णालय अशा दहा ठिकाणी करोना चाचणी केंद्र आहेत.
पालिकेतर्फे दहा ठिकाणी करोनाची चाचणी केली जात आहे. दिवसाला सरासरी ११ हजारांच्या आसपास चाचण्या होत आहेत. तपासणी केंद्रावर नागरिकांची चाचणी करून घेण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, करोना चाचणी केंद्रात वाढ करण्याबाबत सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती शिरीष पोरेड्डी प्रवक्ते, पिं. चिं. महापालिका यांनी दिली.

















